गावाबद्दल

ग्रामपंचायत साखरवाडी

ग्रामपंचायत साखरवाडी (पिंपळवाडी) बद्दल

साखरवाडी गाव हे सातारा जिल्ह्यापासून ७५ कि.मी. व फलटण तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ९५७० असून पुरुष ४८७० व स्त्रिया ४७०० आहेत. मौजे साखरवाडी हे गाव राजकीयदृष्ट्या फलटण तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.

स्थापना वर्ष १९५६

ग्रामपंचायत साखरवाडी ही ISO मानांकन प्राप्त असून नागरिकांना संगणकीकृत सेवा पुरवते. गावात दर रविवारी आठवडा बाजार भरतो ज्यात व्यापारी, शेतकरी व ग्रामस्थ सहभागी होतात.

गाव शैक्षणिक, राजकीय, क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आले आहे. अनेक ग्रामस्थ वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

मुख्य व्यवसाय

शेती, दुग्धव्यवसाय व कारखाना कामगार हे गावातील प्रमुख व्यवसाय आहेत.

सुविधा

शाळा (जि.प. शाळा ५, खाजगी शाळा ३), अंगणवाडी केंद्रे (१३), प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत भवन, व्यायामशाळा, खेळाचे मैदान, बस स्टॉप इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. गावात पाणीपुरवठा योजना २, सार्वजनिक शौचालये ७६ व बचतगट ७३ आहेत.

गावाला अनेक शासकीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

निर्मल ग्राम

स्वच्छता व स्वच्छ पाणी व्यवस्थापनासाठी मिळालेला पुरस्कार.

महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम

सामाजिक सलोखा व तंटामुक्त वातावरणासाठी मिळालेला पुरस्कार.

इतर पुरस्कार

विशेष तंटामुक्त ग्राम, क्रीडा ग्राम, एक गाव एक गणपती, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम, शिवछत्रपती वनश्री ग्राम, विमा ग्राम इत्यादी पुरस्कार गावाला मिळाले आहेत.

लोकसंख्या (२०११)

कुटुंब संख्या

घरांची संख्या

सार्वजनिक इमारती